नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक !

नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक !

मुंबई – शिवसेनेचे अणुशक्तीनगरचे आमदार तुकाराम काते यांनी जाहीरपणे शिवसनेच्या मंत्र्यांवर आणि पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. नाराज असलो तरी शिवसेना सोडणार नाही. नारायण राणे यांनी धमकावून मला शिवसेना सोडण्यास सांगितले होते तरी मी शिवसेना सोडली नाही. छगन भुजबळ यांनी मला अडचणीच्या काळात खूप मदत केली होती. त्यांनीही राष्ट्रवादी येण्याची ऑफर दिली होती. तरीही मी शिवसेन सोडली नाही असंही काते म्हणाले.

त्यातच पक्षाचे आणखी काही आमदार नाराज असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. शिवसेनेच्या बैठकीतही अनेकवेळा आमदारांची नाराजी प्रकर्षाने जाणवली होती. त्यामुळेच आणखी डॅमेज होऊ नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 18 तारखेला ही बैठक होणार आहे.

 

COMMENTS