नारायण राणेंचा निर्णय आज दुपारी 1 वाजता, निर्णयाबाबत केलं ट्विट !

नारायण राणेंचा निर्णय आज दुपारी 1 वाजता, निर्णयाबाबत केलं ट्विट !

मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय आज दुपारी एक वाजता जाहीर करणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये राणे आपला निर्णय जाहीर करतील. राणे यांनी ट्विट करुन पत्रकार परिषदेविषयी माहिती सांगितली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे हे त्यांच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तो पक्ष एनडीएमध्ये सोबत असेल असंही बोललं जातंय. नेमकं राणे काय करतात हे आता काही तासातच स्पष्ट होईल.

COMMENTS