मुंबई-काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणेंनी स्वाभिमानच्या संघटनात्मक मोर्चेबांधणीस वेग दिला आहे. राणे हे 27 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नितेश राणेंनी आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलून याबाबतचे संकेतही दिले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राणे समर्थकही आता पुढे सरसावले असून जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेच्याही सर्व जिल्हाध्यक्षांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. एकाच वेळी पत्रकार परिषद बोलावण्यामागचे कारण मात्र समजू शकलेले आहे. त्यामुळे आता राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
COMMENTS