नारायण राणेंची पुन्हा दिल्लीवारी, राजकीय चर्चेंना उधान

नारायण राणेंची पुन्हा दिल्लीवारी, राजकीय चर्चेंना उधान

दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. काँग्रेंसच्या राज्यातल्या नेत्यांवर त्यांनी थेट निशाणा साधला होता. त्यामुळेच ते भाजपच्या वाटेवर असल्याच्याच्या चर्रा रंगल्या होत्या. यावेळी ते आता दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाटी घेतात की भाजपच्या नेत्यांच्या घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. 10 दिवसांपूर्वीच राणे दिल्लीला गेले होते. त्यावेळीही अशाच चर्चा सुरू होत्या. मात्र आमदार नितेश राणे यांनी राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या वृत्ताचं खंडण केलं होतं.

COMMENTS