मुंबई – मंगळवारी रात्री उशीरा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानावर भेट घेतली. सुमारे पाऊण तास ही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. राणे यांनी एनडीएमध्ये जाण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतो असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. नारायण राणे यांनीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली आहे.
राणे हे एनडीएमध्ये आले तर त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो का ? आणि झालाच तर शिवसेना मंत्रीमंडळात राहते का हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा विरोध डावलून राणेंना मंत्रीमंडळात घेतल्यास शिवसेना कदाचित सरकारमधून बाहेर पडू शकते. तसं झाल्यास मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. मग सरकार वाचवण्यासाठी कोणते अदृश्यं हात पुढे येतात ते दिसून येईल.
COMMENTS