“नारायण राणेंनी नवा पक्ष काढणे ही भाजपाची खेळी”

“नारायण राणेंनी नवा पक्ष काढणे ही भाजपाची खेळी”

नांदेड – काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर आज नारायण राणेंनी  स्वतःचा नवीन पक्षाची घोषणा केली आहे.  ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे या नव्या पक्षाचे नाव असून  नारायण राणेंनी राजकारणातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

‘नारायण राणे यांनी नवा पक्ष काढणे ही भाजपाची खेळी आहे. शिवसेनेची ताकत कमी करण्यासाठी भाजपाची नवी खेळी असून शिवसेनेवर इतर पक्षातून अटैक करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शिवसेना दसरा मोळाव्यात बाहेर पडणार आहे असे म्हणत होती मात्र भाजपवर टीका करण्या व्यक्तीरिक्त सेनेने काहीच केले नाही.’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

 

 

COMMENTS