“नारायण राणेंनी भाजप प्रवेश केला तर सत्तेत राहण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील”

“नारायण राणेंनी भाजप प्रवेश केला तर सत्तेत राहण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील”

सोलापूर – कोकणातल्या माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. ज्यांना मुख्यमंत्री केले त्यांना स्मरण आहे की नाही माहिती नाही. नारायण राणेंनी भाजप प्रवेश केला तर सत्तेत राहायचे की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे वक्तव्य शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.  गोऱ्हे सोलापुरात आल्या होत्या त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

समान नागरी कायदा ही बाळासाहेब ठाकरे यांची मागणी होती. तलाक हे समान नागरी कायद्याचे पहिले पाऊल आहे. समान नागरी कायदा आणि त्याबाबातच्या दुरुस्त्यांना किमान 10 वर्ष कालावधी लागेल. मात्र तलाक संबंधी न्यायालयाने घेतलेला निर्णय आणि भाजप सरकारची असलेली सकारात्मक भूमिका ही समान नागरी कायद्याचे पहिले पाऊल असल्याचे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.

 

COMMENTS