मुंबई – काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असतानाच आता चर्चेला वेगळे वळण लागले आहे. नारायण राणे आता नवा पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राणेंनी वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात 1 ऑक्टोबरला घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दसर्यापर्यंत आपली पुढील भूमिका स्पष्ट करु, असे नारायण राणे यांनी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. याशिवाय काँग्रेसवर हल्लाबोल करत घटस्थापनेदिवशी पुढील वाटचाल जाहीर करु, असेही म्हटले होते.
राणे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. पण, या भेटीमध्ये राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळे राणे नवा पक्ष स्थापन करतात की भाजपमध्ये प्रवेश करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
COMMENTS