मुंबई – ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमध्ये आपल्या भाषणात पुढील राजकीय वाटचालीबद्दल भाष्य केलं नाही. ते आपला राजकीय निर्णय येत्य 21 तारखेल जाहीर करणार आहेत. मात्र त्यांच्या भाषणातून त्यांनी काही संकेत दिले आहेत. कालच्या त्यांच्या भाषणात त्यांनी टीकेचं लक्ष केलं ते केवळ अशोक चव्हाण यांना. काँग्रेसच्या हायकमांडवर टीका करणं त्यांनी टाळलं. तरीही ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत हे निश्चितच आहे. कारण जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राणे हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राणे यांनीही त्याला कधी दुजोरा दिला नाही आणि त्याचा इन्कारही केला नाही. त्यामुळे संभ्रमात भर पडत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भाजप नेत्यांचा राणेंना पक्षात प्रवेश देण्यास विरोध आहे. भाजपला राणेंचा किती फायदा होईल आणि त्यांच्या दोन मुलांना पक्षातं कसं सामावून घ्यायचं तसंच ते पक्षाच्या विचारसणीशी कितपत जुळवून घेतील याबाबत भाजपच्या नेत्यांना साशंकता वाटत असल्याचं बोललं जातंय. त्यामळेच अजूनही राणेंचा भाजप प्रवेशावर निर्णय झाला नसल्याचं बोलंलं जातंय.
मग राणेंसोबत काय पर्याय राहु शकतो ? राणे शिवेसनेत जाऊ शकत नाहीत. अजित पवारांशी त्यांचं फारसं सख्य नसल्यामुळे ते राष्ट्रवादीतही जाण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे ते वेगळा पक्ष काढू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि भाजपवर आक्रमकपणे तुटून पडायचं. शिवसेनेतील नाराज आणि इतर पक्षातील नाराजांना आपल्याकडे खेचायचं आणि स्वतंत्रपणे निवढणूक लढवायची किंवा एखाद्या छोट्यामोठ्या पक्षासोबत आघाडी करुन निवडणूक लढवायची असाही त्यांच्यासमोर पर्याय असू शकतो. थोडक्यात 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला अधिकाधिक डॅमेज करायचं आणि त्याचा फायदा भाजपला होऊ द्यायचा असाही त्यामागे उद्देश असू शकतो. 2019 च्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा भाजपशी जूळवून घ्यायंचं अशीही रणनिती असू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यदाकदाचित शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच तर राणेंच्या मदतीने काही आमदार फोडायचे त्यांन राजीनामा द्यायला लावायचा आणि पुन्हा निवडूण आणायचे असाही पर्याय भाजपचा असू शकतो. यामध्ये अनेक गोष्टी जरतरच्या आहेत. मात्र या शक्यतांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
COMMENTS