नाशिकमध्ये शिवसेना नेत्याचा उष्माघाताने मृत्यू

नाशिकमध्ये शिवसेना नेत्याचा उष्माघाताने मृत्यू

नाशिकमध्ये तालुका उपप्रमुखाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.निलेश शांताराम गायकवाड (32)   असे त्यांचे नाव आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर  येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना तालुका उपप्रमुख निलेश गायकवाड यांना उन्हाचा तडाका बसल्याने बुधवारी उपचारांसाठी नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या मेंदुत ताप गेल्याने उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. निलेश यांचे निधन झाल्याने विंचूर परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. उष्माघातानं आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

COMMENTS