नाशिकमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नाशिकमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नाशिक- नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा परीणाम लगेच दिसायला लागला आहे. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल 35 टक्क्यांनी घसरले.

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार-यांवर  आयकर विभागाने धाड़सत्र सुरु केल्यानंतर  व्यापाऱ्यांनी  आडमुठे  धोरण अवलबित कांदा लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांचा  सडत पडत असल्याने शेतकाऱ्यांना  नुक़सान  सोसावे लागत आहे. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले . कांद्याचे  भाव वाढत असल्याने शासन  ते नियत्रंणात आणण्यासाठी  निर्यात शुल्क वाढवून  व्यापर-यांवर  साठेबाजी बाबत धाड़ टाकन्याचे  षड्यंत्र  करीत असल्याचा आरोप शेतकार्यानी केला .दरम्यान तहसीलदारांनी  व्यापाऱ्यांची बैठक घेवून  सोमवारपासून  लिलाव पुर्ववत  सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .एक तास सुरु असलेल्या आंदोलनामुळे  वाहतुक ठप्प झाली  होती. सोमवारी कांदा लिलाव सुरु न झाल्यास  व्यापाऱ्यांच्या  गाड्या  बाहेर जावू न  देण्याचा इशारा  शेतकऱ्यांनी  दिल्याने शेतकरी आता  हिसंक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

सोमवार पर्यत कांदा लिलाव सुरु करा अन्याथा व्यापा-यांचे परवाने रद्द करु, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी इशारा दिला आहे.

 

 

COMMENTS