नाशिक – देविदास पिंगळे यांचा अखेर राजीनामा !

नाशिक – देविदास पिंगळे यांचा अखेर राजीनामा !

नाशिक – राज्यात मोठी उलाढाल असलेल्या नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदाचा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे पिंगळे  अडचणीत आले होते. आपल्या वैयक्तीक अडचणीमुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. मात्र बाजार समितीच्या 13 संचालकानी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता. पराभवाची नामुष्की टाळण्यासाठीच त्यांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. देविदास पिंगळे हे राष्ट्रवादीचे माजी खासदार आहेत. सोबत पिंगळे यांचे राजीनामा पत्र जोडले आहे.

 

COMMENTS