नाशिक स्थायी समिती भाजपच्या हाती

नाशिक स्थायी समिती भाजपच्या हाती

नाशिक महानगरपालिकेत आज स्थायी सदस्यांची यादी सादर करण्यात आली आहे. पक्षाचे संख्याबळ बघता भाजपच्या नऊ सदस्याची निवड स्थायी समिती सदस्यपदी करण्यात आली आहे.  महापौर, उपमहापौर पाठोपाठ स्थायी समितीवरहि भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं.

 

शिवसेना चार आणि मनसे आघाडीचे 3 सदस्यांची नावेही आज जाहीर झाली. 16 सदस्यांपैकी भाजपचे नऊ सदस्य असल्यामुळे स्थायी समितीच्या तिजोरीच्या चाव्या आता भाजपच्या हाती येणार आहेत.

 

आज झालेल्या निवडीत अशी आहेत सदस्यांची नावे :

भाजप

जगदीश  पाटील, सुनिता  पिंगळे, शशिकांत  जाधव, शिवाजीराव गांगुर्डे, विशाल  संगमनेरे, डॉ. सीमा  ताजने, अलका अहिरे, मुकेश  शहाणे, शाम बडोदे

शिवसेना

सुर्यकांत लवटे, दत्तात्रेय  सूर्यवंशी, प्रवीण  तिदमे, भागवत आरोटे

मनसे – आघाडी 

मुशीर सैयद, राजेंद्र महाले, वत्सला खैरे

COMMENTS