मुंबई : निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. आता मुंबई विद्यापीठाने निकालासाठी आणखी एक तारीख जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी 19 सप्टेंबर ही नवी तारीख दिली आहे.
गणेशोत्सव, ईद या सणांमुळे निकालासाठी उशिर झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. निकालाची डेडलाईन लेखी स्वरूपात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला दिले आहेत. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या नव्या तारखेमुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना आता 19 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
COMMENTS