आपला गट हाच खरा जेडीयू असल्याचा ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा दावा निवडणूक आयोगानं फेटाळून लावला आहे. शरद यादव यांनी या संदर्भात दिलेले पुरावे अपुरे असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष हाच खरा जेडीयू असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बिहारमधील आरजेडी आणि काँग्रेस यांच्यासोबतीचे महागठबंधन सोडून नितीश कुमार यांनी भाजपसोबत घरोबा केला आहे. त्याला पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी विरोध केला होता. तसंच आपला गट हाच खरा जेडीयू असल्याचाही दावा केला होता. मात्र तो फेटाळून लावल्यामुळे नितीशकुमारांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS