नितेश राणेंविरोधात एफआयआर दाखल

नितेश राणेंविरोधात एफआयआर दाखल

सिंधुदुर्ग – मत्स्य आयुक्तांच्या अंगावर मासे फेकल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.  मत्स्य आयुक्त वन्स यांनी राणे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल  केली आहे.

परप्रांतीय मच्छीमार बंदीच्या काळातही मच्छीमारी करण्यास देत असल्याने आमदार नितेश राणे मत्स्य विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी आक्रमक होत मच्छीमारी बंदी आहे तर हे मासे कोठून आले, असा प्रश्न त्यांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला होता. राणेंनी त्यांच्या अंगावर मासे फेकले होते.

दरम्यान, मच्छीमारांच्या अनधिकृत मच्छीमारीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आलो होतो. मच्छिमारांना न्याय मिळावा एवढाच हेतू होता असे आमदार राणे म्हणाले होते.

COMMENTS