पुणे – कर्ज माफीचा निर्णय शेतकर्यांची जी मागणी होती त्याची पुर्तता करणारा नाही. पुर्ण समाधान करणारा निर्णय नाही. पण त्यादृष्टीने पहीले पाऊल म्हणून या निर्णयाचे स्वागत अशा शब्दात कालच्या कर्जमाफीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्ज माफी संदर्भात ज्या मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्याची पुर्तता करण्यासाठी नव्याने प्रयत्न करु अंसही शरर पवार म्हणाले. नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्यांसाठी तुटपुंजी रक्कम देऊ केली आहे. ती वाढवून किमान पन्नास हजार रुपये करावी. राज्य सरकार ला लगेच शक्य नसल्यास पुढील दोन वर्षात ही रक्कम द्यावी. अन्यथा नियमीत कर्ज फेडणार्या शेतकर्यांवर अन्याय होईल असंही शरद पवार यांनी सांगितलं. शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी शेतमालाला हमी भाव द्यावा. भाजपने निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ते पुर्ण करावे अशी मागणीही पवार यांनी केली.
COMMENTS