दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे यातील दोषींना लवकरच फाशीची शिक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

2012 साली झालेल्या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश या चारही दोषींना साकेतच्या जलदगती न्यायालयाने फाशी शिक्षा ठोठावली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती भानूमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

COMMENTS