रत्नागिरी – शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांना राऊत यांनी प्रतिआव्हान दिले आहे. आगामी लोकसभेत निलेश राणे यांचा अडीच लाख मतांनी पराभव करु, असे राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आगामी लोकसभेत विनायक राऊतांना पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही, असा निर्धार माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी कुडाळमधल्या सभेत केला होता. यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश राणे यांचे आव्हान तर आम्ही स्वीकारलेच आहे. उद्या मी उमेदवार असेल वा अन्य कोणी असो, निलेश राणे यांचा अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव करणारच, असे राऊत यांनी निष्ठून सांगितले.
कुडाळमध्ये नारायण राणे यांनी केलेले शक्तीप्रदर्शन नव्हते. तर ते केविलवाणे दर्शन होते. नारायण राणे ब्रम्हराक्षस आहे तो कधी भाजपात जातो याची आम्ही वाटच पाहात आहोत. आज ते ज्या भाषेत बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत आहेत, पुढील सहा महिन्यात ते अशीच टीका भाजपच्या नेत्यांवर करतील, असे ही राऊत म्हणाले.
COMMENTS