मालेगाव – देशाची लोकसभा निवडणुक असो किंवा कुठलीही निवडणुक असो भाजपकडून मुस्लिम उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. एवढचं का काही दिवसांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मुस्लिम मतदारांची संख्या प्रचंड मोठी असतानाही भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. तरीही भाजपला मोठे यश मिळाले. असं असतानाही मालेगाव महापालिकेत भाजपनं तब्बल 45 मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागांपैकी भाजपनं 77 जागांवर उमेदवार दिलेत. त्यापैकी तब्बल 45 म्हणजेच जवळपास 60 टक्के उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवार देऊन भाजपने इतिहास रचला आहे. अर्थात या ठिकाणी मतदारच मुस्लिम असल्यामुळे आणि ध्रुविकरणातही फारसा फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यामुळेच भाजपनं मालेगावच्या मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रय़त्न केला आहे. त्यात किती यश येतं ते पहावं लागेल. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने २४ उमेदवार दिले होते. त्यावेळी भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. १२ उमेदवारांना तर अनामत रक्कमदेखील वाचवता आली नव्हती.
COMMENTS