निवडणुकीत पराभव झाल्याने केली आत्महत्या !

निवडणुकीत पराभव झाल्याने केली आत्महत्या !

निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवारावर किंवा पराभवाला कारणीभूत ठरवून एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचं आपण ऐकलं असेल. पण पराभव झाला म्हणून नेत्याने आत्महत्या केल्याचे कधी ऐकले आहे का? पश्चिम बंगालमध्ये ही दुर्मिळ घटना घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये महानगर पालिकेतील निवडणुकीत अवघ्या 30 मतांनी पराभव झाल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नदिया महानगरपालिकेच्या कूपर्स कॅम्प मतदारसंघातून सुप्रिया डे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तृणमूल काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या सुप्रिया यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने बंडखोरी केली होती. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानाचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. निकालात तृणमूलचे उमेदवार अशोक सरकार यांनी त्यांचा 30 मतांनी पराभव केला. सुप्रिया यांना 320 मते तर सरकार यांना 350 मते मिळाली.

या पराभवानंतर सुप्रिया यांनी विविध प्रकारच्या  35 गोळ्या एकत्र घेतल्या आणि आत्महत्या केली. याच मतदारसंघातून त्यांनी 2007 आणि 2012च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला होता.  2012 च्या विजयानंतर त्या तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, सुप्रिया यांचे पती समीर यांनी पक्षातील काही कार्यकर्त्यांनकडून सुप्रिया यांना धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आल्याचे सांगितले.  यासंदर्भात कोणाविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र पक्ष नेतृत्वाने यासंदर्भातील निर्णय घ्यावा, असे समीर यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS