निवडणूक अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी शशिकला यांचे पुतणे दिनकरनला  अटक

निवडणूक अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी शशिकला यांचे पुतणे दिनकरनला अटक

निवडणूक अधिकाऱ्याला लाच दिल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शशिकला यांचे पुतणे टी. दिनकरन यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांच्या चौकशीनंतर दिनकर आणि त्यांचे निकटवर्तीय मल्लिकार्जूनलाही पोलिसांनी अटक केली आहे. दिनकरन यांच्या अटकेने शशिकला यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आरके नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने एआयएडीएमकेचे चिन्ह ‘दोन पान’ जप्त केले होते. हे चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना तब्बल 50 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दिनकरन यांची सलग चार दिवस चौकशी केली. चौकशीनंतर काल (मंगळवारी) रात्री उशीरा पोलिसांनी दिनकर आणि त्यांचे सहकारी मल्लिकार्जून यांना अटक केली.

 

 

COMMENTS