निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनवर प्रात्यक्षिक करून दाखवा, ‘आप’ला निवडणूक आयोगाचे आव्हान

निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनवर प्रात्यक्षिक करून दाखवा, ‘आप’ला निवडणूक आयोगाचे आव्हान

ईव्हीएम मशीन ही सुरक्षित असल्याने कोणत्याही प्रकारचे फेरफार करता येत नाहीत. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने ईव्हीएम   मशीनमध्ये कशा पद्धतीने फेरफार होऊ शकतो, हे आपतर्फे यावेळी दाखविण्यात आले. मात्र, आपकडून वापरण्यात आलेली मशीन बनावट असून आयोगाची मशीन वापरुन दाखवा, असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले आहे. बनावट उपकरणावर केलेला प्रयोग ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करणे योग्य नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने मंगळवारी (दि. 9) डमी ईव्हीएम मशिन आणून त्यात कशी फेरफार करता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मात्र, आपने जे मशीन वापरले होते, ते बनावट आणि अतिशय साधारण स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करीत निवडणूक आयोगाने आमच्या अधिकृत ईव्हीएममध्ये अशा प्रकारची फेरफार करूनच दाखवा, असे आव्हान आपला दिले आहे. बनावट उपकरणावर केलेला प्रयोग ग्राह्य धरला जाणार नाही. अशाप्रकारे चुकीची प्रात्यक्षिके दाखवून नागरिकांची दिशाभूल करणे योग्य नाही, अशा शब्दात आयोगाने आम आदमी पार्टीला फटकारले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शुक्रवारी ईव्हीएममधील वादावर चर्चा कऱण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. अलीकडेच पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेली ईव्हीएम निवडण्याचा पर्याय राजकीय पक्षांना असेल. हे मशीन निर्वाचन सदनमध्ये ठेवण्यात येईल आणि तिथे ईव्हीएमविरोधकांनी त्यात फेरफार करून दाखवावा, असे खुले आव्हान आयोगाने दिले आहे.

COMMENTS