निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनसंदर्भात 12 तारखेला बोलावली सर्वपक्षीय बैठक

निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनसंदर्भात 12 तारखेला बोलावली सर्वपक्षीय बैठक

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार आणि घोटाळा केल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमबाबतच्या शंका आणि संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत 12 मे रोजी ही बैठक होणार आहे.  

आम आदमी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्षासह अन्य पक्षांनीही ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यापुढील निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. ईव्हीएमवरून लोकांचा विश्वास उडाला आहे, असा दावा या पक्षांनी केला होता. मात्र, भाजपने विरोधकांवर जोरदार टीका केली होती. विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत व्हावे लागल्याने विरोधक ‘आगपाखड’ करत असल्याचे भाजपने म्हटले होते.

 

COMMENTS