निवडणूक व्यवस्थापनासाठी भारत 6 देशांसोबत करणार करार !

निवडणूक व्यवस्थापनासाठी भारत 6 देशांसोबत करणार करार !

नवी दिल्ली -निवडणूक व्यवस्थापनातील सहकार्यासाठी भारत 6 देशांशी करार करणार आहे. म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान, अल्बानिया, ईक्वाडोर आणि गिनी या देशांशी संबंधित करार केले जाणार आहेत. याबाबत आज निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडाने मंजुरी दिली आहे.

इतर देशांचे सहकार्य घेतल्याने निवडणूक व्यवस्थापनाला अधिक बळकटी येईल, अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. त्यातून या क्षेत्रातील सहकार्यासाठीचा प्रस्ताव आयोगाने केंद्र सरकारकडे दिला होता. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.

 

COMMENTS