वैद्यकीय परिक्षा अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परिक्षा म्हणजेच नीट साठी देशात 23 नवी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिलीय. नवीन केंद्रांपैकी महाराष्ट्रात 4 नवी केंद्रे देण्यात आली आहेत. हे करत असताना मराठवाड्याला नवीन एकही केंद्र देण्यात आलं नाही. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, आणि अमरावती ही नवीन केंद्रे देण्यात आली आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर अशी सहा केंद्रे होती. या नवीन 4 केंद्रामुळे महाराष्ट्रतील केंद्रांची संख्या 10 झाली आहे. मात्र नवीन केंद्रे देताना पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देत मराठवाड्यावर अन्याय करण्यात आला आहे.
मराठवाड्यावर कसा झाला अन्याय ?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी फक्त औरंगाबाद हे केंद्र आहे. भौगोलिकदृष्ट्या मराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी हे गैरसोईचे आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी जवळपास 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्रातील केवळ 6 सहा यजिल्ह्यांसाठी 3 केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातली विद्यार्थ्यांना 100 ते 125 किलोमीटार पेक्षा कमीच प्रवास करावा लागणार आहे. परिक्षा केंद्रे देताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मराठवाड्यावर अन्याय केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या अन्याविरोधात मराठवाड्यातील खासदार आवाज उठवतात की मुग गिळून बसतात याकडे मराठवाड्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. असाच काहीसा अन्याय विदर्भातील विद्यार्थ्यावरही झालाय. तुम्हालाही सरकारच्या या अन्याविरोधात आवाज उठवायचा असेल तर आम्हाला [email protected] आयडीवर मेल करा आणि तुमची रोखठोक मते कळवा. आम्ही ती मते मराठवाड्यातील खासदार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत पोचवू आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.
COMMENTS