दिल्ली – काँग्रेस पक्ष सध्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेला हा पक्ष सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहे. तो नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे जर त्याचे अध्यक्षपद बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्याकडे दिले तर दोघांचाही फायदा होईल आणि देशाचीही फायदा होईल असं खळबळनक वक्तव्य नामवंत इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. सध्या काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व नाही तर नीतीशकुमारांकडे पक्ष नाही त्यामुळे त्यांना एकमेकांची गरज आहे. असंही गुहा म्हणाले. गांधी नंतरचा भारत या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
संघ आणि नरेंद्र मोदींवरही टीका
सध्या भारताची ओळख हिंदू पाकिस्तान होत चालली आहे, ही चिंताजनक बाब असल्याचीह रामचंद्र गुहा म्हणाले. भारतात सध्या सुरु असलेला कट्टरवाद आणि हिंसाचार भारताला हिंदू पाकिस्तानकडे नेत असल्याची टीकाही त्यांनी केली. सत्तेवर आल्यापासून नरेंद्र मोदींनी आरएसएस पासून अंतर ठेऊन राहयला पाहिजे होते. ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे भारतात धार्मिक तेढ वाढत असल्याचही गुहा म्हणाले.
COMMENTS