नीतीशकुमार यांनी आज सकाळी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजभवनात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी दोघांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.काल संध्याकाळी महागठबंधनचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांनी पदमुक्त व्हावं अशी नीतीशकुमार यांची इच्छा होती. मात्र त्या यादव यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे नीतीशकुमार यांनीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, भाजपच्या तंबूत उडी मारली.
नितीशकुमारांनी केवळ 24 तासाच्या आत महागठबंधन सोडून एनडीएच्या तंबूत दाखल झाले असले तरी त्यांच्याकडे काठावरचं बहुमत आहे. त्यातच जेडीयूमध्ये मुस्लिम आणि यादव समाजाचे जवळपास 20 आमदार आहेत. ते भाजपसोबत जाण्यास फारसे कन्फर्टेबर नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सरकार टिकवताना नीतीशकुमार यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
COMMENTS