नॅशनल हेराल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे.
नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे. याआधी नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांची याचिका फेटाळली होती. ज्याच्या माध्यमातून स्वामींनी कॉंग्रेस आणि एसोसिएट जर्नल लिमिटेड म्हणजेच एजेएलच्या अकाउंट आणि बॅलेंस शीटची माहिती मागितली होती. यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिलासा मिळाला असे म्हटले जात होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात डिसेंबर 2015 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांना पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी जामीन देखील मिळाला होता. सुब्रमण्यम स्वामींनी याचा विरोध करत म्हटले की, दोघांना जामीन मिळाला तर ते देश सोडून पळून जातील. यानंतर जून 2016 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळेल असे वाटत होते पण दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला आहे.
COMMENTS