मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा
आजचे दि.8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस सो हे शिर्डी गावात नगरपंचायत तर्फे आयोजित अमृत योजने अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे 37 कोटी रूपये चे कामाचे भुमीपुजन समारंभाचे उद्घाटन करणार असुन सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.राधाकृष्ण विखे आहेत..
………………………………………………………………………………
शनिवारी अजित पवार,धनंजय मुंडे,सुनील तटकरे कल्याणात..
राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
सकाळी 10 ते 4,
वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कल्याण
अजितदादा आणि तटकरे प्रेस
सायंकाळी 4 वाजता
वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कल्याण
अजितदादा आणि तटकरे यांचा नेवाळी दौरा
सायंकाळी 6 वाजता
……………………………………………………………………………………..
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर यांचा अहमदनगर जिल्हा दौरा
शनिवार दिनांक 8 जुलै,2017 रोजी दुपारी 1.00 वाजता निवासस्थान (भक्तीनिवास) जालना येथून शासकीय मोटारीने शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगरकडे प्रयाण ( प्रवासमार्ग- जालना-औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी) सायंकाळी 4.30 वाजता शिर्डी येथे आगमन . सायंकाळी 5.00 वाजता शिर्डी नगरपंचायत शिर्डी केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत शिर्डी शहर वाढीव पाणी पुरवठा योजना कामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. ( स्थळ – साई किमया गार्डन, नांदुर्खी रोड, शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर) सायंकाळी 6.00 वाजता हॉटेल ग्रीन व्हयू शिर्डी येथे राखीव. सायंकाळी 7.00 वाजता शिर्डी येथून शासकीय मोटारीने जालनाकडे प्रयाण.
………………………………………………………………
आदिवासी विकास मंत्री श्री विष्णू सावरा यांचा अहमदनगर जिल्हा दौरा……
शनिवार दिनांक 8 जुलै,2017 रोजी दुपारी 1.00 वाजता वाडा निवासस्थान येथून शासकीय मोटारीने शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगरकडे प्रयाण ( अधई-आटगाव-घोटी-सिन्नर मार्गे-शिर्डी) सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, शिर्डी येथे आगमन व राखीव. रात्री 8.00 वाजता गुरुपोर्णिमा महोस्तवनिमित्त विश्वात्मक ध्यानयोग मिशन कोनशीला अनावरण व अभ्यासक्रम पुस्तिका प्रकाशन सोहळयास मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत उपस्थिती. ( स्थळ – आत्मा मालिक शैक्षणिक संकूल, कोकमठाण (विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण ता. राहाता जि. अहमदनगर) रात्री 11.00 वाजता गुरुपोर्णिमा महोस्तवानिमित्त अनुग्रह (नामदान सोहळा) तसेच भव्य सत्संग सोहळयास उपस्थिती. ( स्थळ – आत्मा मालिक शैक्षणिक संकूल, कोकमठाण (विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण ता.राहाता ) सोयीनुसार कोकमठाण येथून वाडा जि. पालघर निवासस्थानाकडे प्रयाण.(कोकमठाण-सिन्नर-घोटी-आटगाव – अधई मार्गे वाडा)
COMMENTS