पंकजा मुंडेंना भगवान गडावर भाषणास पुन्हा एकदा परवानगी नाकारली

पंकजा मुंडेंना भगवान गडावर भाषणास पुन्हा एकदा परवानगी नाकारली

बीड – भगवान गडावर येत्या 30 सप्टेंबरला होणा-या दसरा मेळावा होणार होता. मात्र भगवान गडावर होणा-या  दसरा मेळावासाठी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा परवानगी नाकारण्यात आली आहे.

गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.  भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचे अढळ श्रद्धास्थान आहे. हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचे केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे.

भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू द्यायला नामदेव शास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच, असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतला होता. गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातले संबंध दुरावले आणि त्यातूनच हा वाद आणखीनच चिघळला आहे.

COMMENTS