पंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी

पंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी

पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या छगन भुजबळांची मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भेटलाही वेगळा अर्थ होता. या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कट्टर विरोधक दिलीप खैरे यांनी आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांची भेट घेतली. दरम्यान, ओबीसी मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांची प्रकृतीत सध्या ठिक नाही. त्यामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बुधवारी सकाळी राज्याच्या महिला ब बालविकास मंत्री पंकजा मुंडे अचानक भुजबळांच्या भेटीला रुग्णालयात येऊन थडकल्या. मुख्यमंत्री परदेशात असताना पंकजा मुंडेंनी भुजबळांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, मराठा मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी मोर्चा असल्याची चर्चाही आहे.

COMMENTS