औरंगाबाद – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणखी नव्या भोवर्यात सापडली आहे. पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवेंच्या कंपनीतून दुषित केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांचा शेंद्रा औद्योगिक वसाहतीत रॅडिको डिस्टिलरीज हा मद्यनिर्मितीचा कारखाना आहे. अमित पालवे या कारख्यानाचे संचालक असून पंकजा याही पूर्वी संचालकपदी होत्या. या कारखान्याला शासकीय योजनेतून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या कारखान्यातून बाजुच्या कुंभफेळ गावात केमिकलयुक्त पाणी सोडलं जात असल्यानं आता या गावातील नागीरकांचे आरोग्य धोक्यात आलंय. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. इतकंच नाही तर गावातल्या विहिरी, बोअरवेल्स आणि हातपंपातूनही लाल पाणी येतं. परिणामी इथली शेती नापीक झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रेडिको मद्यार्क कंपनीतून निघणारं हे पाणी सुकना धरणात जातं. तिथून 10 ते 15 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.
याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रदूषण महामंडळाकडे तक्रारी केल्या. मात्र पंकजा मुंडे या मंत्री असल्यामुळे यावर अद्याप कारवाई झालेली नाही. तर दुसरीकडे ते पावसाचं पाणी असल्याचं सांगत रेडीको कंपनीने आपले हात वर केले आहे.
COMMENTS