औरंगाबाद – ‘पंकजा मुंडे यांना घरामधला आणि पक्षातला संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. तसेच पंकजाने दसरा मेळाव्याला प्रचंड मोठी सभा घेऊन भाजपला उत्तर दिले आहे. त्यातून भाजपने बोध घ्यावा.’ असा टोला पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी लगावला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश महाजन बोलत होते. ‘भगवान गडावर पंकजांना दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता. प्रशासनानेही या मेळाव्याला परवानगी नाकारली. सत्तेत असलेल्या कॅबिनेट मंत्र्याच्या सभेला प्रशासन परवानगी नाकारतेच कसे?, असा सवाल महाजन यांनी केला. हा प्रकार लोक पाहत आहेत. त्यांना सर्व समजतं, पंकजा सध्या घर आणि पक्ष अशा दोन्ही पातळीवर संघर्ष करत आहेत. प्रत्येकाला अशी परीक्षा पास व्हावीच लागते आणि दसरा मेळाव्यानंतर पंकजा ही परीक्षा मेरिटने पास झाली आहे, असं ते म्हणाले.
COMMENTS