शरद पवार आणि मुंडे मग ते गोपीनाथ मुंडे असो किंवा पंकजा मुंडे एकमेकांचे राजकारणले कट्टर विरोधक… मात्र अनेकवेळा दोन्ही बाजुंनी एकमकांबद्दल तेवढचा आदर व्यक्त केला जातो आणि एकमेकांचं कौतुकही…. गोपीनाथ मुंडे हयात असतानाही ते व्हायचं आणि आता पंकजा मुंडे यांच्या काळातही ते होत आहे….
औरंगाबादमध्ये काल शरद पवार यांचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. राज्यातले सर्व पक्षांचे मुख्य नेते या कार्यक्रमाला हजर होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी शरद पवारांबद्दलची आठण सांगितली. पंकजा या जेंव्हा 10 वीत होत्या तेंव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 10 वीत असताना एकदा परिक्षेमध्ये मी पाहिलेला मुख्यमंत्री यावर निबंध लिहायचा होता. तेंव्हा आपण शरद पवार यांच्यावर निबंध लिहिला होता असं त्यांनी सांगितलं. मात्र त्या निबंधात काय लिहिलं हे मात्र त्यांनी सांगितलं नाही…..
COMMENTS