पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कॅ. अमरिंदर सिंह

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कॅ. अमरिंदर सिंह

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कॅ. अमरिंदर सिंह यांना राज्यपाल व्ही. पी. सिंह बदनोर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे अमरिंदर सिंह मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर निवडणुकीआधी काँग्रेसचा हात पकडलेले नवज्योतसिंह सिद्धू कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

 

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी अमरिंदर सिंह यांचे नाव निश्चित मानले जात होते. अखेर आज अमरिंदर सिंह यांचा शपथविधी पार पडला.

 

मंत्रीमंडळात ब्रम्ह महिन्द्रा, क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू, मनप्रित सिंह बादल, साधू सिंह धर्मसम्राट, त्रिप्ट राजिंदर सिंह बाजवा, राणा गुरजीत सिंह, चरणजित सिंह चन्नी, अरुणा चौधरी आणि रजिया सुल्ताना यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल व्ही. पी. सिंह बदन्नोर यांनी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे.

COMMENTS