चंदीगढ – पंजाबमधील अमरिंदरसिंग यांच्या सरकारने मुलींच्या शिक्षणाबाबत क्रांतीकारी निर्णय काल जाहीर केला. या निर्णयानुसार सरकारी शाळांमध्ये यापुढे नर्सरी पासून ते पीएचडीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी काल याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलजबावणी पुढील वर्षापासून केली जाणार आहे. या निर्णयाबरोबरच राज्यातील 13 हजार प्राथमिक शाळा आणि 48 सरकारी कॉलेजेसमध्ये फ्री wifi देण्याची घोषणाही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी केलीय. निवडणूपूर्व जाहीरनाम्यात त्यांनी ही आश्वासने दिली होती. देशाच्या साक्षरतेच्या दरापेक्षा (73 टक्के ) पंजाबमध्ये साक्षरतेचा दर अधिक (75.84 टक्के) आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचा दर कमी आहे. मात्र या निर्णयामुळे महिलांचा आणि एकूणच पंजाबमधील साक्षतरतेचा दर वाढवण्यास मदत होणार आहे.
COMMENTS