पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी अतुल भोसले

पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी अतुल भोसले

मुंबई – पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी सातारा जिल्ह्यातील कराडचे भाजप नेते अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. अतुल भोसले यांनी कराडमधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचेच बंडखोर बाळासाहेब पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. खासदार उदयनराजे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना तिथून भाजपचा नगराध्यक्ष निवडूण आला. त्यामध्ये अतुल भोसले यांचा मोठा वाटा आहे. पुढील निवडणुकीतही ते कराडमधून भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचंही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं.

COMMENTS