“पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी यशवंतरावांनी घालवली” !

“पंतप्रधानपदाची चालून आलेली संधी यशवंतरावांनी घालवली” !

मुंबई – शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष आणि शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला 55 वर्ष झाल्यामुळे दोन्ही नेत्यांचा विधीमंडळामध्ये नुकताच गौरव करण्यात आला. सर्व पक्षातीली नेत्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ पतंगराव कदम यांनीही यावेळी भाषणात दोन्ही नेत्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी मराठी माणूस खाल्ल्या मिठाला जागतो त्यामुळे अनेक संधी  दडवतो असं सांगितलं. लालबहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. नीलम संजीव रेड्डी यांनी यशवतंराव चव्हाण यांना पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी बोलावले होते. मात्र ते गेले नाहीत. मला नेहरुंनी राजकारणात पुढे आणले आहे. त्यामुळे इंदिराजींना विचारल्याशिवाय मी येणार नाही असं त्यांनी सागितलं. इंदिराजींकडे यशवंतराव गेले. तेंव्हा इंदिराजींनी मलाच पंतप्रधान व्हायचं आहे असं सांगितलं. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी चालून आलेली संधी घालवली असंही पंतगराव कदम यांनी सांगितलं.

COMMENTS