पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा लीक प्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. या निर्णयानंतर शरीफ यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आले आहे.
नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लांड्रिंगचा आरोप होता. या प्रकरणी आज पाकिस्तानच्या सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने त्यांना याप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधान पदावरून हटवण्याचा निर्णय पाकिस्तान सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची गादी कोण संभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
COMMENTS