पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा केवळ ‘ड्रामा’ – लालू प्रसाद यादव

पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा केवळ ‘ड्रामा’ – लालू प्रसाद यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये पूरस्थितीची हवाई पाहणी केली. हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जोरदार टीका केली आहे. ‘यापूर्वीही बिहारमध्ये अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली पण, त्यावेळी मोदींना ती महत्वाची वाटली नाही.  पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा फक्त ड्रामा असल्याची टीकाही लालू प्रसाद यांनी केली आहे.

एखाद्या छोट्या होडीमधूनही त्यांनी कुठल्याही ठिकाणाला भेटही दिली नाही, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे. बिहारमध्ये पूर आलेला नाही, तर आणला गेला आहे. नीतिशकुमार सरकारच्या इंजिनिअरने धरण फोडून हा पूर आणला आहे’ असा घणाघाती आरोपही लालू प्रसाद यादव यांनी नीतिशकुमार यांच्यावर केला.

COMMENTS