बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! हे कसं काय शक्य आहे आणि तसं झालंच असेल तर मग नेमकं काय झालं असेल? तर तुमची उत्सुकता फार न ताणता एका मोडलेल्या लग्नाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. नरेंद्र मोदींना जसे खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत तसं त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचं झालं असं उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक लग्न ठरलं होतं. लग्न ठरल्यानंतर काही किरकोळ खरेदी करण्यासाठी वधू आणि वर आपल्या कुटुंबियांसोबत खरेदीला गेले होते. बोलता बोलता नवरा आणि नवरीमध्ये देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा सुरू झाली. नवरी म्हटली देशाची आर्थिक स्थिती खूप खराब झाली आहे. त्याला पंतप्रधान मोदी हे जबाबदार आहे. हे एकताच नवरा मुलगा संतापला. तो मोदींचा भक्त होता. त्याला त्याच्या भावी पत्नीचं हे बोलणं पसंत पडलं नाही. त्याने त्याला विरोध केला. देशाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. आणि नरेंद्र मोदींमुळे देशाची आर्थिक भरभराट होत आहे असं तो म्हणाला. त्यामुळे तु जे बोललीस ते शब्द मागे असं तो सांगू लागला. मात्र नवरी तिच्या मतावर ठाम होती. त्यामुळे हा वाद वाढत गेला. तो एवढा वाढला की नवरा नवरीमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. नवरी मुलीने आपण लग्नासाठी आपले विचार बदलू शकत नाही असं ठणकावून सांगितलं तर मुलगाही कट्टर मोदी समर्थक होता. मीही मोदींविषयी असल्या भलत्या सलत्या गोष्टी ऐकूण घेणार नाही असं म्हणाला. त्यामुळे संतापलेल्या नवरी मुलीने मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही असं सांगितलं. दोन्ही कुटुंबियांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला. मात्र ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. अखेर लग्नानंतर पुढे वादावादी नको म्हणून दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठरलेले लग्न केवळ मोदींवरुन मोडले. त्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
COMMENTS