नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) डिजीटल पेमेंटला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी ‘भीम आधार’ या अॅपचे उद्घाटन करणार आहेत. डिजीटल भारत होण्यासाठी क्रांतिकारक ठरणाऱ्या या अॅपचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त उद्घाटन होत आहे.
‘भीम आधार’ हे डिजीटल व्यापारासाठी ‘आधार’च्या साहाय्याने व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या स्मार्टफोनद्वारा प्रत्येक भारतीयाच्या बायोमेट्रीक डाटाला जोडले जाणार आहे. भारतीय नागरिकांना स्मार्टफोन, इंटरनेट, डेबीट, क्रेडीट कार्ड यांची कसलीही मदत न घेता डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम आधार’ द्वारा जोडले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी असलेल्या दुरदृष्टीमुळे याला ‘भीम आधार’ अॅप हे नाव देण्यात आले आहे.
COMMENTS