पंतप्रधान मोदींनी घेतला मुख्यमंत्र्याचा सोशल मीडियाचा तास !

पंतप्रधान मोदींनी घेतला मुख्यमंत्र्याचा सोशल मीडियाचा तास !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपची सत्ता असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सोशल मीडियाचा वापर या मुद्दावर विशेष चर्चा या बैठकीत करण्यात आली. मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यासोबत सोशल मीडियाचा अधिक वापर कसा करायचा याचा वर्ग घेतला.

 

सकाऴी 8 ते 9 या दरम्यान दररोज मोदी यांनी केलेल्या ट्वीट्सला रिट्वीट करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटच्या फॅालोअर्सची संख्या पंतप्रधानमंत्र्यांना सांगितली. यात गेल्या शंभर दिवसात वाढलेल्या फॅालोअर्सची किती संख्या वाढली याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना कितीवेळा रिट्विट केले यांचीही माहिती दिली. बैठकीत विकास, सुशासन, गरीब कल्याण यावर विशेष भर देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाय राज्यातील केंद्राच्या योजनांची अमंलबजावणी किती प्रमाणात झाली याविषयी आढावा घेण्यात आला. अमित शहा यांच्याप्रमाणे केंद्राच्या 17 योजनाविषयी प्रचार- पसार करण्यास मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. कर्नाटक, गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पूर्वकडील राज्याच्या विधानसभा निवडणूका 2019 मध्ये होणार आहेत. यासंबधीत चर्चा या बैठकीत झाली.

 

 

 

COMMENTS