पंतप्रधान मोदींविरोधात दिग्विजय सिंह यांचं आक्षेपार्ह ट्विट

पंतप्रधान मोदींविरोधात दिग्विजय सिंह यांचं आक्षेपार्ह ट्विट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. त्यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक मीम शेयर केले. ज्यात पंतप्रधान मोदीच्या समर्थकांना ‘भक्त’ तर त्यांच्यासाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे.

या ट्विटमध्ये मोदींचं छायाचित्र असून त्या बाजूला त्यांच्यावर टीका करणारा शिवराळ मजकूर आहे. मोदींची यशस्वी कामगिरी… ‘भक्तांना *** बनवलं आणि *** लोकांना भक्त बनविलं’, अशा आशयाचा तो मजकूर आहे. हा फोटो पोस्ट करताना दिग्विजय म्हणतात, ‘हा मेमे माझा नाही. पण तो पोस्ट केल्याविना मला राहवत नाही. ज्याच्याबद्दल तो आहे त्याची माफी मागतो. पण मूर्ख बनविण्याच्या कलेत ते सर्वोत्तम आहेत.’ असे दिग्विजय सिंह म्हणाले आहे. यापूर्वी देखील त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून मोदी यांना लक्ष्य केले आहे.

COMMENTS