पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट, काय झाली नेमकी चर्चा ?

पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट, काय झाली नेमकी चर्चा ?

अस्ताना – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही नेत्यांची भेट ही राष्ट्रप्रमुखांच्या लाउंजमध्ये झाली.
नवाज शरीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर मोदी आणि शरीफ यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे मोदींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. पंतप्रधान मोदी शांघाई सहयोग संघटनच्या (SCO) शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते कझाकस्तानमध्ये गेले आहेत. कझाकस्तानच्या राष्ट्रपतींनी शांघाई सहयोग संघटनच्या सर्व नेत्यांना गुरुवारी डिनरसाठी आमंत्रित केले होते. त्याआधी मोदी आणि नवाज यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, मोदी आणि शरीफ यांच्या भेटीचा कोणताही अधिकृत कार्यक्रम अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-पाक सीमेवर तणावचे वातवरण आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तर कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरूनदेखील दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच मोदी आणि नवाज यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

COMMENTS