मुंबई – पक्षांतर प्रतिबंध सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकातील तरतूदींना विरोधी पक्षांनी हरकत घेतली होती. विधेयकातील तरतूदींवरुन विरोधांनी जोरदार गदारोळ घातला. त्यानंतर मतदानाची मागणी केली. मतदानानंतर बहुमताच्या जोरावर हे विधेयक संमत करण्यात आले. विधेयकाच्या बाजुने 87 तर विरोधात 34 मते पडली. पक्षांतर करणा-या सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर अपीलाची सुनावणी राज्य शासन घेणार अशी त्यामध्ये तरतूद आहे. आधी अशी सुनावणी घेण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांकडे होते. याला विरोधकांनी हरकत घेतली आहे.
COMMENTS