पत्रकारांना कायद्याचं संरक्षण; पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्ष कारावास

पत्रकारांना कायद्याचं संरक्षण; पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्ष कारावास

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांची शासनाने गंभीर दखल घेतली असून या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पत्रकारांकरीता संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी विधानसभेत या संदर्भातील विधेयक आज मंजूर करण्यात आले.
या विधेयकाच्या मसुद्याला काल (दि.6) मंत्री मंडळाने मान्यता दिली होती.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. यावर कोणतीही चर्चा सभागृहात झाली नाही. वृत्तपत्र, वृत्त वाहिन्या आणि ऑनलाइन वेब पोर्टलमध्ये पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना या कायद्याचे संरक्षण मिळणार आहे. पत्रकारांवर हल्ला झाल्यास किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केल्यास दोषी व्यक्तीला 3 वर्षे  कैद किंवा 50 हजार दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच गुन्ह्याच्या स्वरूपानुसार दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा राहणार आहे.

 

COMMENTS