परदेशातील काळ्या पैशावरुन राम जेठमलानी यांचा भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल !

परदेशातील काळ्या पैशावरुन राम जेठमलानी यांचा भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल !

सांगली – परदेशातील काळ्या पैशाबाबत भाजपचे नेते कितीही गप्पा मारत असले तरीही कारवाई शून्य आहे अशा शब्दात देशातील ज्येष्ठ वकील आणि भाजप नेते राम जेठमलानी यांनी हल्लाबोल केलाय. परदेशात ज्या भारतीयांचा पैसा आहे अशा लोकांची नावे का मागवली जात नाहीत आणि त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवालही जेठमलानी यांनी केला आहे.

काळ्या पैशाबाबत कारवाई करण्याच्या बाबत काँग्रेस आणि भाजप यांची भूमिका सारखी आहे. दोन्ही पक्ष काळा पैसा बाळगणा-यांवर कारवाई करत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. गुन्हेगारांना पाठबळ देण्याच्या कामात भाजप आणि काँग्रेस यांच्यात आपसात भागिदरी आहे असाही आरोप राम जेठमलानी यांनी केला आहे.

COMMENTS