परभणीत कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणीत कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

सेलू  – मुला, मुलीचा शिक्षणाचा खर्च, बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केली. शहरातील दत्तनगरातील एका शेतकर्‍याने राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने गळफास घेवून अात्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता.24) रोजी सकाळी उघडकीस अाली.

दत्ता काशिनाथ केकान (वय 40) या शेतकर्‍याने सततच्या नापिकीमुळे बॅकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे अाणि मुला, मुलिच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने दत्तनगरातील राहत्या घरातील वाड्यात अाडूला दोरीच्या साह्याने बुधवारी राञीच्या सुमारास गळफास घेवून अात्महत्या केली. केकान यांना तालुक्यातील चिकलठाणा येथे सात एकर जमीन असून त्यांच्याकडे स्टेट बँक अाॅफ इंडिया या बँकेचे कर्ज अाहे.केकान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार अाहे. या घटनेने दत्तनगर परिसरात हळहळ व्यक्त होत अाहे.

 

COMMENTS